तुळजापूर,दि.२९ :
गुरुवार दि.२९ रोजी
शहर व ग्रामीण भागात सर्वञ कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्याही वाढत असल्याने तुळजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात आँक्सिजन बेड कमी पडत आहेत, त्या दृष्टीने 124 कोविड सेंटर येथे आँक्सिजन सेंटर लाईन टाकून झाली आहे, परंतु पुढील काम रखडलेले असुन ते काम तातडीने पूर्ण करण्याबाबत सबंधिताना तात्काळ सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
ऑक्सिजन प्लांट टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करावी व श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने रेमडिसीविर इंजेक्शन खरेदी करण्यात यावीत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना दिले.
यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार , युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे,माजी पंचायत समिती सदस्य अच्युत वाघमारे,गणेश नन्नवरे यांच्या सह्या आहेत.