लोहारा , दि.२९
माकणी ता. लोहारा  येथील बी.एस.एस. महाविद्यालयात "संस्थात्मक विलगिकरन" सेंटरचे मान्यवरांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. 

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य ‌ केंद्र  यांनी हा उपक्रम हाती घेतला. संपूर्ण तयारीसह  उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी  तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी एस.ए.अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ.रमाकांत जोशी,  आरोग्य अधिकारी डॉ संतोष मनाळे,   सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, किशोर साठे, ज्ञानदेव सुरवसे,  सरदार मुजावर, विश्वनाथ पत्रिके, अदिजण उपस्थित होते. 

ग्रामीण भागात स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह, प्रसाधनगृह अशी सुविधा बऱ्याचदा उपलब्ध नसते. त्यामुळे गृहविलगीकरन केले असता कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा होऊ शकते. तसेच काही रुग्ण गृहवीलगिकरन घेऊन बाहेर पडले तर इतर नागरिकांना बाधा होऊ शकते. त्याअनुषंगाने संस्थात्मक विलगिकरन हा उत्तम पर्याय होऊ शकतो. माकणी येथील कॉलेजमध्ये सध्या एकूण २५ रुग्णांना ठेवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बांधित झालेला प्रत्येक रुग्ण हा आधी  लोहारा येथे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर रुग्णाचे रक्ताचे रिपोर्ट नॉर्मल असतील आँक्सिजन चे प्रमाण नॉर्मल असेल तसेच कोविडची लक्षणे नसतील व प्रकृती स्थिर असेल अश्याच रुग्णांना संस्थात्मक विलगिकरनामधे ठेवण्यात येणार आहे.
 
 
Top