नळदुर्ग, दि.२९ :
शासकीय नियमाचे पालन करुन
सर्वांनी मिळून गावातून कोरोनाला हद्दपार करू व "माझे गाव-कोरोना मुक्त गाव" करण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन अणदुर   ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायत   सरपंच रामचंद्र  आलुरे यांनी केले आहे.


 अणदूर ग्रामपंचायतच्या वतीने नागरिक,व्यापारी ,युवकाना आवाहन करण्यात आले आहे की, सर्वञ  दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज ५०० पेक्षा अधिक  रुग्ण संख्या होत आहे.

आपल्या गावातही दररोज रुग्ण सापडत  असुन रुग्ण वाढीला आपणच जबाबदार आहोत.वेळोवेळी प्रशासनाने घालून दिलेले नियम  मोडत चाललो आहोत, याचाच परिणाम आहे. त्यामुळे पुढील काळात नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सर्वांनी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, ग्रामपंचायत कार्यालयाने वेळोवेळी जाहीर केलेल्या आवाहनास प्रतिसाद द्यावा,कोणताही आजार लपवू नये तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करून योग्य उपचार घ्यावेत, सर्वांनी आपले व आपल्या कुटूंबातील जेष्ठ व्यक्तींना कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे,सर्वांनी  कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी,कामाशिवाय घराबाहेर पडू नये,सार्वजनिक ठिकाणी वावरताना व घरातुन बाहेर पडताना मास्क लावावे व शारीरिक अंतर बाळगावे ,बाहेरुन आल्यावर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवावेत, गावात अंत्यविधी असल्यास जास्तीची गर्दी करू नये ,आपण आहोत तेथूनच श्रद्धांजली अर्पण करावी असेही आवाहन आलुरे यानी केले आहे.  



 
Top