तुळजापूर , दि. १३: डॉ. सतीश महामुनी
श्री. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवार रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी महाराज व महंत हमरोजी महाराज यांनी गुढीची यथासांग पूजा केली.
तुळजापुर येथील श्री. तुळजाभवानी मंदिरामध्ये परंपरेनुसार देवीची नित्योपचार पूजा मंगलमय वातावरणात संपन्न झाली. या पूजेनंतर कळसावर गुढी उभारण्यात आली. व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले आणि इतर पुजारी सेवेकरी या प्रसंगी उपस्थित होते.