उस्मानाबाद, दि .१३ :
दहिफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आणि वडगाव येथील आरोग्य उपकेंद्रास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी आज भेट देऊन पाहणी केली .
यावेळी त्यांनी कोरोना लसीकरणाची माहिती घेऊन याबाबत काही महत्वपूर्ण सूचना केल्या . उपस्थित पात्र लाभार्थ्याना लस घेण्याबाबत मार्गदशन केले . तसेच गाव पातळीवरील सर्व पदाधिकारी सरपंच , ग्रामसेवक, तलाठी आणि इतर नागरिकांनी लस मोहिमेचे उद्दिष्ट शंभरटक्के साध्य करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले . तसेच त्यांनी आरोग्य यंत्रणेस काही सूचनाही दिल्या.
माझे कार्यालय सुंदर कार्यालय मोहिम यशस्वीपणे राबवून अंतर व बाह्य परिसर स्वच्छता , झाडे लावणे झाडे जगवणे, पक्ष्यांना चारा पाणी व्यवस्था करण्याचे आदेश दिले .