वागदरी,दि.१३:एस.के.गायकवाड
तुळजापूर पंचायत समितीच्या नुतन सभापती रेणुका इंगुले यांचा वागदरी ता.तुळजापूर येथे सोमवार रोजी सत्कार करण्यात आला.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या लोहगाव येथील मूळरहिवासी असलेल्या सौ. रेणुका भिवाजी इंगोले यांची नुकतेच तुळजापुर पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल वागदरी ता. तुळजापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विद्यामान सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार,उपसरपंच मुक्ताबाई कुंडलिक वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित नंदगाव ता. तुळजापूर पं.स.गणाचे सदस्य सिध्देश्वर कोरे ,लोहगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते भिवाजी इंगोले यांचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रामसिंग परिहार यांनी तर अभार एस.के.गायकवाड यांनी मानले.
यावेळी बोलताना भिवाजी इंगोले म्हणाले की, गावातील विकासात्मक कामाला प्राधान्य देवून गावाच्या आडीआडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तरी ग्रामस्थानी जागृत राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रा. प.सदस्या बकुला भोसले, विद्या बिराजदार, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, जेष्ठ कार्यकर्ते किसन पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फतेसिंग ठाकूर, मोहनसिंग चव्हाण, यु्वा नेते अमोल पाटील, बाळू पवार,आप्पू गोगावे, अप्पा बिराजदार,नागनाथ सुरवसे, सोमनाथ बिराजदार, दिपक धुमाळ, चंद्रकांत वाघमारे, सादु वाघमारे, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.