तुळजापूर , दि. १२ : डॉ सतीश महामुनी

भारतीय संविधान प्रतीकात्मक प्रतिकृती तुळजापूर येथील पोलीस ठाण्यासह विविध कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३o जयंती निमीत्ताने  तुळजापूर शहरातील  शासकिय कार्यालय तहसिल, नगरपरिषद, पंचायत समीती, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रूग्णालय येथे भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रीकेचे  (प्रतीमेचे) वाटप केले.

यावेळी आयोजक सागर कदम, जीवण कदम, लक्ष्मण कदम, अनमोल शिंदे, कमलेश कदम तसेच पो. स्टेशन येथे प्रतीमा देताना नगरसेवक विजय कंदले, औंदूबर कदम, नगरसेवक किशोर साठे,उपस्थीत होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून देशाला मिळालेले संविधान हे देशाच्या अखंडत्वसाठी बनला आहे. सर्व जाती धर्मांना सर्व धर्म समभाव सांगणारे आपल्या भारताचे संविधान सतत जनतेसमोर राहिलं पाहिजे, या उद्देशाने जयंतीच्या निमित्ताने शासकीय कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबविल्याचे संयोजक सागर कदम यांनी सांगितले.
 
Top