तुळजापूर,दि.१२ : 
सोमवार रोजी  तुळजापूर नागरिकांच्या वतीने जिजामाता नगर या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 

 सुरुवातीस उद्घाटनासाठी  नगरपरिषद तुळजापूर  नगराध्यक्ष  सचिन रोचकरी ,युवा नेते नगरसेवक  विनोद  गंगणे , राहुल ,परमेश्वर कदम, हिंदू खाटीक युवाचे जिल्हाध्यक्ष  दिनेश पलंगे  समाज सेवक  संतोष  इंगळे ,सह्याद्री ब्लड बँकेचे टेक्निकल सुपरवायझर  प्रताप चौरे आदीच्या प्रमुख उपस्थितीत  तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

  हिंदू नववर्ष गुढीपाडवा, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सतीश माने, दत्ता जगताप, रोहित दाभाडे, ओमकार काटवटे, मंथन रांजणकर , मनोज काचोळे, दीपक पलंगे पुढाकार घेतले.
 
Top