तुळजापूर,दि.१२ :
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे रविवार रोजी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त महात्मा फुले युवा मंचाच्या वतीने फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तालुक्यात काक्रंबा येथील महात्मा फुले युवा मंचाच्या वतीने यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन करत सोशियल डिस्टंसनचे पालन करत महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अनावश्यक खर्चाला फाटा देत अतिशय साधेपणाने साजरी करून फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष हरिदास वाघमारे, पवन वाघमारे,मनोज वाघमारे ,सागर माळी, दत्ता क्षिरसागर,दशरथ वाघमारे, प्रसाद मोरे,गणेश वाघमारे, अजित सुरवसे, प्रमोद काशिद, गजानन वाघमारे, बालाजी गोडसे, सुधीर क्षिरसागर, नितीन फुलसुंदर, नानासाहेब बनसोडे, शिवाजी माळी, मारुती साळुंके, गोंविद माळी, दिनेश वाघमारे,प्रशांत गरड, अमोल ढेकरे आदी उपस्थितीत होते.