काटी , दि.१२: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे शेत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
तहसीलदार सौदागर तांदळे यांनी शेती कामाकरता दिवसेंदिवस कमी मनुष्यबळाची उपलब्धता, त्यामुळे कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरण करणे, ही काळाची गरज शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्यामुळे, दळणवळणा करिता शेत व पाणंद रस्ते यांची मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय साधून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून तालुक्यांमध्ये शेत रस्ते व पानंद रस्ते यांचे जाळे विणण्याचे काम अतिशय वेगाने चालू केले. याचाच एक भाग म्हणून तामलवाडी ग्रामपंचायतचा प्रस्ताव मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांची बैठक घेऊन, सर्व शेतकऱ्यांचे वाद-विवाद मिटवून कोविड-१९ च्या दिशा निर्देशांचे पालन करून दि. 11 एप्रिल रोजी मौजे तामलवाडी येथे शेत रस्त्याचे भूमिपूजन केले.
पोलीस प्रशासन व शेतकरी बांधवही या योजनेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासाचा, प्रगतीच्या मार्गाची कवाडे खुली होण्यास निश्चित हातभार लागत आहे, या शेत रस्ताच्या भूमिपूजन प्रसंगी तामलवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित , मंडळाधिकारी जगताप , अमर गांधले , तलाठी श्रीमती अशू राजमाने, तलाठी आबासाहेब सुरवसे, शिवाजी सावंत , हनुमंत गवळी, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, आप्पासाहेब रनसुरे, प्रमोद पाटील, बाबूलाल पटेल, विवेकानंद लोंढे, इनुस पटेल, चाकई, कुंदुर बंधू, दस्तगीर पटेल, अजिज पटेल, अप्पू राजे गवळी, ज्ञानेश्वर जगताप, समाधान गायकवाड, तुकाराम गायकवाड हे शेतकरी उपस्थित होते.