दस्तापूर,दि.१२ एस.के.गायकवाड

 पंचशील बुद्ध विहार विपश्यना केंद्र दस्तापुर (आष्टामोड) ता.लोहारा येथे थोर समाजसेवक महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रविवारी रक्त दान शिबीर संपन्न झाले.

 युगप्रवर्तक बहुउद्देशिय फांऊंडेशन उस्मानाबाद , पंचशील बुद्ध विहार विपश्यना केंद्र दस्तापूर व कै.डॉ. वैशंपायन शासकीय रक्त पेढी शासकीय सिव्हिल हाँस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्दमाने महात्मा फुले यांच्या १९३ व्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीचे औचित्य साधुन पंचशील बुद्ध विहार विपश्यना केंद्र दस्तापूर (आष्टामोड) येथे दि.११ एप्रिल  रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. वसुंधरा पाटील, डॉ. सरीता गोरे, रक्त पेढी अधिक्षक राजू माने,प्रयोगशाळा तंत्रज्ञ रूपांजली माशाळकर,वेणुगोपाल देवसानी आदी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

या शिबिरात तब्बल ४२  दात्यानी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. या प्रसंगी सर्व रक्त दात्याचे युगप्रवर्तक बहुउदेशियस फाउंडेशन उस्मानाबाद व पंचशील बुद्ध विहार विपश्यना केंद्राच्या वतीने आभिनंदन करण्यात आले.
 
Top