जळकोट,दि.१२
गोर सिकवाडी चे संस्थापक तथा प्रमुख मुखिया कै.काशीनाथ नायक यांचे नुकतेच हैद्राबाद येथिल अपोलो हाॅस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना तुळजापूर तालुक्यातील जळकोट बोरमन येथे सामुहीक श्रध्दाजली वाहण्यात आली.
त्यांच्या जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली असून त्यांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभर फिरून प्रचार, प्रसार केला.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट अंतर्गत आसलेल्या बोरमन तांडा येथे गोर सिकवाडी ,गोर सेना, समस्त बंजारा समाजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी सभापती प्रकाश चव्हाण, जिल्हा सह संयोजक शिवाजी राठोड, गोर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण,गोर सेना तालुकाध्यक्ष राजु चव्हाण, रेवू राठोड ,वसंत महाराज, वसंत चव्हाण,राजु राठोड, विकास चव्हाण आदी उपस्थित होते.