चिवरी-येवती रस्त्याची दुरवस्था, नागरिकांसह वाहनधारकांचे प्रचंड हाल, रस्ता खराब असल्याच्या कारणावरून दोन वर्षापासून बससेवा बंद
चिवरी,दि.१२: राजगुरु साखरे
तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील चिवरी ते येवती या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे . रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालवीताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चिवरी इंदीरानगर ते उमरगा(चि) चौरस्तावरील पुर्णपणे खडि उखडली आहे.त्यामुळे ग्रामस्थासह वाहनचालकांना खड्यातुन वाट काढावी लागत आहे. तसेच या मार्गानी येणारी बस रस्ता खराब असल्याच्या कारणावरून दोन वर्षापासून येत नाही. बसचालक व वाहक रस्ता खराब असल्याचे कारण सांगुन बाजुला होतात.या मार्गानी येणारी बससेवा बंद असल्यामुळे आरळी, काळेगाव, येवती, चिवरी येथील विद्यार्थ्यांचे खुप मोठे नुकसान होते. तसेच या मार्गाने येणारी एकमेव बस असल्यामुळे दुसरा कुठलाच पर्याय नसल्यामुळे खासगी वाहनातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्याची अवस्था ही अतीशय बिकट झाली आहे. त्यामुळे चिवरी येवती ग्रामस्थातुन संताप व्यक्त होत आहे . तत्काळ हा रस्ता संबंधित वरीष्ठ अधीकाऱ्यांनी व तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार यांनी तातडीने लक्ष घालुन रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी ग्रामस्थातुन जोर धरत आहे होत आहे.