तुळजापुर, दि. ११:

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले सामाजिक शैक्षणिक कार्य हे कधीच विसरता येत नाही. कारण खर्‍या अर्थाने सामाजिक सुधारणेचा पहिल्यांदा पाया महात्मा ज्योतिबा फुले यांनी घातला होता. समाजाला दिशा देण्याचे काम या महापुरुषाने केले. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचा पाया घालत असताना स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिल्यांदा शिक्षण देऊन या शिक्षणाच्या चळवळीत महिलांना आणण्याचं पवित्र कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून केले. 

 मानवी जीवनाच्या प्रगतीच्या परिवर्तनाची खरी लाट ज्योतिबा फुले यांनी आणली. हे कोणालाही नाकारता येत नाही, अशा शब्दात महात्मा ज्योतिराव फुले यांचा गौरव याप्रसंगी डॉ. सुभाष राठोड यांनी केला.

कोरोनाच्या या संकट काळातही सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महाविद्यालयात मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. 

 यावेळी डॉ. सुभाष राठोड, डॉ. तुळशीराम दबडे, डॉ. अतिश तिडके, डॉॅ. संतोष पवार,  सिद्धू सुतार,  भागिनाथ बनसोड उपस्‍थित होते.
 
Top