पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आंबी पो.ठा. येथे दाखल 2 गुन्ह्यातील 3 आरोपींना आज दि. 28 मे रोजी खालीलप्रमाणे दंडात्मक शिक्षा सुनावल्या आहेत.

उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 17 / 2016 या गुन्ह्यातील आरोपी- रामेश्वर गोविंद पवार, रा. अंबेजवळगे, ता. उस्मानाबाद यांनी भा.दं.सं. कलम- 354 (ब), 323, 504, 34 चे उल्लंघन केल्याबद्दल 3,000 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 10 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 16 / 2018 या मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी- 1)रामा अंकुश गोफणे 2)आण्णासाहेब अंकुश गोफणे, दोघे रा. सोनेगाव, ता. उस्मानाबाद या दोघांनी भा.दं.सं. कलम- 327, 324, 323, 504, 506, 34 चे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 500 ₹ दंड व दंड न भरल्यास 3 दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 
Top