पोलीस ठाणे, नळदुर्ग: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने दि. 27 मे रोजी पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत नटराज रामा राठोड, रा. रामतिर्थ तांडा, ता. तुळजापूर हे तांड्यावरील अंबिका हॉटेल मध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 3,200 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत त्याच तांड्यावरील नंदकुमार शंकर पवार हे आपल्या राहत्या घरासमोर 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना पथकास आढळले.

 

पोलीस ठाणे, उमरगा: लालय्या तेलंग, रा. डिग्गी, ता. उमरगा हे दि. 26 मे रोजी आपल्या राहत्या शेडसमोर 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,200 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना उमरगा पो. ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top