पोलीस ठाणे, तुळजापूर: दिलीप बिल्डकॉन कंपनी यांनी उस्मानाबाद- सिंदफळ पर्यायी मार्गावरील खांबावर बसवलेल्या ॲमरॉन कॉन्टा बॅटरी- 28 नग, सोलर चार्जर- 14 नग, सोलर पॅनल- 2 नग, मिडीया कनव्हर्टर व इसीबी असे साहित्य दि. 25- 26.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या कंपनी कर्मचारी- सुरेश सपन सरकार यांनी दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: विजय शिवाजी भुतेकर, रा. खामसवाडी, ता. कळंब यांची होंडा ड्रिम युगा मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एए 7292 ही दि. 04- 05.03.2021 दरम्यानच्या रात्री गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजय भुतेकर यांनी दि. 27 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तामलवाडी: गणपत बाबु जाधव, रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर यांच्या देवकुरुळी गट क्र. 568 मधील शेत विहीवरील व कुपनलीकेतील विद्युत पंपाचे 150 फुट केबल दि. 26- 27.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गणपत जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.