उस्मानाबाद,दि.२६:  जिल्हयात लॉकडाउन काळात खालील बाबतीत गैरवर्तन, उल्लंघन केल्यास वाढीव दंड वसुलीचा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा आदेश आहे. त्यास अनुसरून उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि. 25.05.2021 रोजी खालील चार प्रकरणांत दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.



1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: एकुण 05 कारवायांत- 1,800/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: एकुण 52 कारवायांत- 26,000/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: सोशल डिस्टन्सींग करीता जमीनीवर खुना न आखणे, दुकाना समोर गर्दी निर्माण करणाऱ्या व्यक्ती- दुकान चालक यांच्याविरुध्द एकुण 586 कारवायांत 1,22,300/-रु. दंड वसुल करण्यात आला आहे.

4)कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसवणे: लॉकडाउन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी 1 कारवाईत 500/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

 
Top