पोलीस ठाणे, वाशी: लक्ष्मण पवार, रा. घुमटाचा फड, वाशी हे दि. 25 मे रोजी आपल्या राहत्या घरासमोरील झाडाखाली एका कॅनमध्ये 25 लि. गावठी दारु (किं.अं. 1,800 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, भुम: बंडु शेळके, रा. कृष्णापुर, ता. भुम हे दि. 25 मे रोजी अवैध मद्य विक्रीच्या उद्देशाने भुम येथील ‘ड्रायव्हर ढाबा’ समोर देशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 1,248 ₹) बाळगलेले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
पोलीस ठाणे, तुळजापूर: दिलीप काटेवाल, रा. कात्री, ता. तुळजापूर हे दि. 25 मे रोजी गावातील बेगडा रस्त्यालगत 15 लि. गावठी दारु (किं.अं. 900 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.