भूम, दि. 16
शेतामध्ये बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री करत असताना पोलिस पथकाने छापा मारून नऊ खोक्यामधील 580 बाटल्या व साहित्य असे मिळून 63 हजार 144 रूपयेचा मुद्देमाल ताब्यात घेवून आरोपीस अटक केली.
भुम तालुक्यात हिवर्डा शिवारातील टेंबीदेवी डोंगराचे बाजूच्या शेतात एक व्यक्ती अवैध मद्य बाळगून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास आज दि. 16 मे रोजी मिळाली. यावर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोलिस हेड कॉन्स्टेबल धनंजय कवडे, पोलिस नाईक- महेश घुगे, अमोल चव्हाण, शेळके, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकाने नमूद ठिकाणी 13.30 वा. सु. छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी एका पत्राशेडच्या बाजूस तानाजी श्रीराम मुंडे, वय 31 वर्षे, रा. हिवर्डा, ता. भुम हे 9 खोक्यांमध्ये एकुण 180 मि.ली. देशी दारुच्या 432 बाटल्या, 180 मि.ली. विदेशी दारुच्या 148 बाटल्या व 1000 मि.ली. विदेशी दारुच्या 20 बाटल्या व मद्य भरण्यासाठी 2 कॅन (एकुण किं.अं. 63,144 ₹) अवैपणे बाळगलेले असताना पथकास आढळले.
यावरुन पोलीस पथकाने नमूद अवैध मद्यासह साहित्य जप्त करुन तानाजी मुंडे यांच्याविरुध्द भुम पो.ठा. येथे महाराष्ट मद्य निषेध कायदा कलम- 65 (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे