उस्मानाबाद, दि. 08
दोघांनी एका युवकास मंत्रालयात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष देवून सहा लाख रूपये घेवून संबंधीतास नोकरीचे बनावट आदेश देवून फसवणुक केल्याप्रकरणी उसनाबाद येथील आनंदनगर पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल पाटील व मारुमी लोखंडे, दोघे रा. तोरंबा, ता. उस्मानाबाद यांनी बँक कॉलनी उस्मानाबाद येथील राजवर्धन गवारे यांना 6 लाखाच्या मोबदल्यात मंत्रालयात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष जानेवारी 2021 मध्ये दाखवले होते. त्यापोटी गवारे यांनी नमूद दोघांना 3 लाख दिले असता नमूद दोघांनी त्यांना संबंधीत मंत्रालयीन विभागाचे बनावट सही- शिक्के वापरून बनवलेला बनावट नोकरी आदेश गवारे यांना दिला. अशा मजकुराच्या गवारे यांनी दि. 07 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 467, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे..