नळदुर्ग ,दि.८: 

प्रशासन व लोकसहभागातुन नळदुर्ग 
शहरात आठवड्यापुर्वी सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरला राष्वादी पदाधिका-यांच्या वतीने  शनिवार रोजी गाद्या व सॅनिटायझर भेट देण्यात आले आहे.


  नळदुर्ग शहरातील  डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला नळदुर्ग शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख व शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद पुदाले यांनी २५ गाद्या व २५ पिलो तसेच सॅनिटायझर भेट दिले आहे. 

नळदुर्ग येथे प्रशासन व लोकसहभागातुन ८० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू आले आहे. नळदुर्ग शहर व परीसरात सध्या कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. 

त्यामुळे नळदुर्ग शहर व परीसरातील कोरोना बाधित रुगणांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वस्तीगृहात प्रशासन व लोकसहभागातुन ८० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. 

या कोव्हीड केअर सेंटरचा नळदुर्ग शहर व परीसरातील गावातील लोकांना चांगला फायदा होत आहे. .८ मे रोजी या कोव्हीड केअर सेंटरमध्ये  ४२ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या याठिकाणी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आता याठिकाणी ७५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी गाद्या आणि पिलोची तात्काळ आवश्यकता होती. 
नगरसेवक बसवराज धरणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष महेबुब शेख यांना याबाबतची माहिती दिली. 


त्यानंतर महेबुब शेख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद पुदाले यांनी तात्काळ २५ गाद्या,२५ पिलो व सॅनिटायझर कोव्हीड केअर सेंटरला भेट दिले. ८ मे रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, नगरसेवक मुश्ताक कुरेशी, बसवराज धरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शफीभाई शेख यांच्या हस्ते गाद्या, पिलो, सॅनिटायझर कोव्हीड केअर सेंटरला देण्यात आले. 


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बशीर शेख, पत्रकार विलास येडगे, लतीफ  शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, पप्पु पाटील, जिविशाचे धनंजय  वाघमारे, अमोल फत्तेपुरे, सुर्यकांत हजारे व कोव्हीड केअर सेंटरमधील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top