लोहारा,दि.८:  आब्बास शेख
नैसर्गिक आपत्ती असो अथवा संसर्ग आजाराच संकट असो नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आपले कर्तव्य जनता कर्फ्यूमध्ये पार पाडत  असुन काटेकोर अमलबजावणी केली जात आहे.  

अशा भीषण संकट काळात नागरिकांनी  पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, अशीच भूमिका प्रथमता पोलीस प्रशासनाकडून वठवली जात असल्याचे चित्र लोहारा शहरासह तालुक्यातून दिसून येत आहे.


 लोहारा तालुक्यामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने तसेच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या ब्रेक द चैन लागू असलेल्या आदेशाचे पालन अंमलबजावणी करण्यासाठी लोहारा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी होमगार्ड सरसावले असून शहरात आज पहिल्याच दिवशी  कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे.


दि. ८ मे ते १३ मे पर्यंत असलेल्या जनता कर्फ्यूच्या अमलबजावणीसाठी लोहारा पोलीस सरसावले असून छत्रपती शिवाजी महाराज चौकासह आदी ठिकाणी जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन करू नये म्हणून तटस्थ पहारा देत पोलिस अधिकारी कर्मचारी होमगार्ड हे आपले कर्तव्य बजावीत आहेत.

तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह आदी ठिकाणी  कर्फ्यू बाबत पोलिसाकडून कडक अंमल बजावणी करण्यात येत आहे


 कर्फ्यू कालावधीत अनावश्यक नागरिकांनी घराबाहेर फिरू नये, तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन लोहारा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी केले आहे.

     जनता कर्पयु मध्ये दुचाकी स्वाराचे  पेट्रोल साठी अडमुठेपणा 

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार रोजी  पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यू सुरू असताना  जिल्हाधिकारी  यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक आस्थापना वगळता सर्व बंद ठेवण्यात आले आहे.  संकट काळात विश्र्वेकर पेट्रोल पंप अत्यावश्यक वगळता बंद करण्यात आले आहे. परंतु मोटार वाहन धारक व मोटर सायकल नागरिक पेट्रोल पंप भोवती लाकडी ब्रॅकेट तोडून दुचाकीस्वाराचा पेट्रोल मागणीसाठी अढमुठेपणा दिसून येत होता. पेट्रोल पंप मालक यांनी तात्काळ विना कारण दुचाकी स्वार गर्दी करीत असल्याने भ्रमणध्वनीद्वारे पोलिसांना कॉल करून सदर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी सांगितल्यानंतर तात्काळ पोलिस घटनास्थळी येताच दुचाकीस्वार पळ काढले.  यामुळे गर्दी आटोक्यात आली. यामध्ये बिन कामी दुचाकीस्वाराची संख्या अधिक होती.

 
या कामी पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण, पोलीस कर्मचारी हनुमंत पापुलवार, एस एस पांचाळ,विजय कोळी,प्रवीण नळेगावकर,अनिल बोदमवाड, होमगार्ड जावेद जेवळे, बिलाल गवंडी, हाजीलाल मोमीन आदीसह  कर्मचारी कर्तव्य बजावीत आहेत.
 
Top