उस्मानाबाद, दि. ८
सांजा ता. उस्मानाबाद या गावातील नाभिक समाजातील आत्महत्याग्रस्त मयत कै. मनोज झेंडे यांच्या कुटुंबियांना शिवसेने कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदत करण्यात आली.
शनिवार दि. 8 मे रोजी शिवसेना उपशहर प्रमुख सतिश आदरकर यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने , शिवसेना शहर प्रमुख संजय मुंडे, मनोज केजकर, धनंजय झेंडे व मनोज झेंडे यांच्या पत्नी व झेंडे कुटुंबिय तसेच समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.