शिराढोणचे पञकार तथा प्रगतीशील शेतकरी राजेंद्र मथुरादास मुदंडा यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी उपचारादरम्यान लातूर येथे निधन झाले.
मागील दोन आठवडय़ापुर्वी कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती सुधारत असतानाच आज पहाटे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
राजेंद्र मुंदडा हे जिह्यातील प्रगतशील शेतकरी होते. त्यांनी 80 एकरावर इस्राईल तंत्रज्ञान वापरून केशर आंबा, मोसंबी फळबागा लागवड केली होती. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या उद्यान पंडीत या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा शेतीनिष्ठ पुरस्कारासह अनेक पुरस्कार देऊन राजेंद्र मुंदडा यांना गौरविण्यात आले होते. एक प्रगतीशिल शेतकरी म्हणुन पंचक्रोशीत त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, मुलगा, भाऊ, बहिन असा मोठा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.