तुळजापूर ,दि.८:कुमार नाईकवाडी 
संसर्गजन्य कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  तुळजापुर नगर परिषदेच्या  वतीने कडक अमलबजावणी करण्यात येत आहे. एका दुकानावर व ११ विनामास्क फिरणा-याविरुध्द दंडात्मक कारवाई करुन साडेसहा हजाराचा दंड वसुल केला.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार संपुर्ण जिल्ह्यामध्ये   दि.८ में शनिवार पासुन ते दि.१३ में गुरुवार रोजी पर्यत  संपूर्ण जिल्हाभर जनता कर्फ्यु  लागू केला आहे.  सदरील आदेशाची शहरातील व्यापारी वर्गानी काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने त्या त्या भागात फिरून कोणतेही दुकान उघडे राहणार नाही व सदर आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेणे तसेच आवश्यक ठिकाणी न.प. कडून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. 


 नगरपरिषद  मार्फत पुढील प्रमाणे  शहरात वेगवेगळे  पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये पथक क्र.१ सज्जन गायकवाड- पथक प्रमुख सोबत 5 कर्मचारी असतील सदर पथक फिरते पथक असेल,  पथक क्रमांक २  पाठक व्ही.व्ही. पथक प्रमुख, व इतर 5 कर्मचारी सदर पथक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महाद्वार या ठिकाणी कारवाई करतील, पथक्र.क्रमांक 3  वैभव अंधारे, कर निर्धारक प्रशासकीय सेवा पथक प्रमुख,  व इतर 5 कर्मचारी सदर पथक बस स्टँड डॉ. आंबेडकर पुतळा नगरपरिषद कार्यालय समोरून कमान वेस मार्गे महाद्वार व राज्य रस्ता येथे दंडात्मक कारवाई करतील, वरील नियुक्त न.प. कर्मचाऱ्यांनी दि.८ शनिवार रोजी धडक कारवाई  सुरु  केली . 

यावेळी उस्मानाबाद रोड येथील मलबा दुकान संकुलातील श्रीफळ एजन्सी यांना यापूर्वी ‌वारंवार सुचना देवुनही कोरोना नियमांचे नियम तोडून साहित्य विक्री करताना दिसुन आल्याने त्यांच्यावर ५ हजार रुपयेची दंडात्मक कारवाई  करण्यात आली.  सदर कार्यवाही वैभव अंधारे यांच्या पथकाने केली. शिवाय इतर ११ व्यक्तीकडून विनामास्क फिरताना आढळून आल्याने त्यांच्याकडून  १ हजार ४०० रुपये असे एकूण  ६ हजार ४०० रुपये इतका दंड वसुल केला आहे.  

नागरीकांनी जनता कर्फ्युमध्ये सर्व नियमाचे  काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नगराध्यक्ष  सचिन रोचकरी , मुख्याधिकारी  आशिष लोकरे यांनी तुळजापूरवासीयांना  केले आहे.
 
Top