चिवरी,दि.८:
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शुक्रवारी दि.७ रोजी झालेल्या मेघगर्जनेसह अवकाळी पावसात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरासमोरील बांधलेल्या गोठ्यात वीज कोसळून म्हैस दगावल्याची घटना घडली आहे,
येथील शेतकरी धनाजी धोंडीबा घोडके यांनी आपल्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये म्हैस बांधलेले होती.
याच वेळी दुपारी सुरू झालेल्या अवकाळी पावसामध्ये वीज कोसळून गाभण म्हैस जागीच ठार झाली. यात घोडके यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सदरील घटनेची माहिती मिळताच तलाठी डी एन गायकवाड घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.