उस्मानाबाद, दि. 10
उस्मानाबाद जिल्हयात संसर्गजन्य कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिका-यांनी शनिवार दि. 8 मे ते गुरूवार दि. 13 मे या कालावधीत जनता कर्फ्यु लागू केले होते. मात्र रमजान ईद हा सन आल्याने बुधवार दि. 12 मे रोजी पासून जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा देणारे दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहणार असून सर्व बँका सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत चालू राहतील. असे जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केल्यावरून किराणा, बेकरी, भाजीपाला, फळ दुकाने सुरू होणार आहेत.