उस्मानाबाद,दि.११ : 
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत असून ७  हजार ६०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण ४४हजार ६९८ रुग्ण  कोरोना बाधित झाले असून एकुण १हजार ३२ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूचा दर २.३२टक्के असून ते मराठवाडयात सर्वाधिक  असल्याचे भाजयुमोच्यावतीने राज्यमंञी संजय बनसोडे याना पञाद्वारे सांगण्यात आले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात ६० आयसीयू बेडसाठी केवळ २ भीषक (फिजिशियन )व २ भूलतज्ञ आहेत. रुग्ण संख्येच्या प्रमाणात डॉक्टर्स व इतर सपोर्टींग स्टाफ फारच कमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सीजन, बेड व आयसीयू ची गरज वाढली असून उपचारासाठी विशेषज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे.

तरी जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय  वैद्यकीय केंद्रासाठी विशेषज्ञ डॉक्टर्स व सपोर्टींग स्टाफ तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी राज्यमंञी ना. संजय बनसोडे  यांच्याकडे पत्रद्वारे केली. 


यावेळी  पाटील, प्रीतम मुंडे , प्रसाद मुंडे, स्वप्नील नाईकवाडी उपस्थित होते,
 
Top