मुरुम, दि. १० :
कलदेव लिंबाळा, ता.उमरगा येथील दत्तात्र्य परमेश्वर कारभारी यांचे लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी दि.१० रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते.
निधनाची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. ते मुरूमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. गेल्या ३० वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व जेष्ठ कार्यकर्ते होते. तसेच गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायतीचे गेल्या १५ वर्षापासून सदस्य तर यापुर्वी उपसरपंच म्हणूनही पाच वर्ष काम केले.
त्यांच्यावरती त्यांच्या शेतात रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
भोसगा, ता.लोहारा येथील
ग्रामविकास अधिकारी संजय कारभारी यांचे ते वडील होत.