किलज,दि.११: 
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता प्रादुर्भाव पाहता यातच सर्वत्र दि.१ मे पासून १८ वर्षापुढील ते ४५ वय असणाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येत आहे.यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले.


 ऑनलाइन नोंदणी करताना अनेक नागरिकांकडून चुका होत आहेत .काही जणांना  तांत्रिक अडचणी  येत आहेत.तर काही नागरिकांकडे ऑनलाईन  नोंदणी करण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही.आशा नागरिकांची अडचण लक्षात घेऊन येथील युवकांनी एकत्र येत  कोरोनाच्या काळात लसीकरण मोहिमेसाठी आपल्या माध्यमातून लसीकरण नोंदणी करून देऊ असा निर्धार केला. आणि  किलज ता. तुळजापूर  येथिल प्रदीप शिंदे, वैभव मर्डे,विकी शिंदे, किरण शिंदे,या तरुण युवकांनी  आपली  टीम बनवून टीमद्वारे गावातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी  करण्याची मोहीम हाती घेतली.


ज्या नागरिकांना नोंदणी करण्यास जमत नसेल त्यांना नोंदणी करून देऊ असे आवाहन या युवकांनी केले आहे. गावातील  व्हाट्सअप्प ग्रुप इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच अडचण असल्यास त्यांच्या टीम मधील सदस्यांना संपर्क साधण्याचे आवाहन युवकांनी केले आहे.


या कठीण काळात कोरोनाचा  धोका वाढत असताना अनेकांनी ही लस घेतली असून या लसीचा निकाल योग्य पध्दतीने असल्याचे सांगण्यात येत आहे.लसीचा कोणताही दुष्परिणाम  नाही. 

गावातील सर्व लोकांनी लसीकरण करून घ्यायला हवे यासाठी या तरुणांनी ही धडपड सुरू केली आहे.यामध्ये  हे तरुण युवक सध्या हे सामाजिक बांधिलकी राखत ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम करत असुन गावातील सर्वांचं लसीकरण व्हावं यासाठी धडपड करीत आहेत.

 
Top