नळदुर्ग : मानेवाडी ता. तुळजापूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने एक एकर
क्षेत्रावरील पत्ता कोबीच्या पिकावर नांगर फिरवला आहे, कारण काय तर लॉकडाउनमध्ये
मार्केट बंद आसल्याने कोबीच्या एका नगला पाच रुपयेचा ही भाव मिळत नाही. त्यामुळे
पिकासाठी केलेला खर्च ही मातीमध्ये घालून या शेतकऱ्यांने पत्ता कोबीच्या
पिकामध्ये नांगर फिरवून खरीपाच्या पिकासाठी जमीनीची मशागत करण्यास सुरुवात केली
आहे.
कोरोनामुळे शासनाने संचार बंदी लागू केला आसल्याने याचा परिणाम हा
सर्वसामान्य नागरीक, मजूरदार, शेतकरी यांना जाणवत आहे, अनेकांना कामे मिळत
नसल्याने त्यांची उपासमार होत आहे, यामध्ये खऱ्या आर्थाने भरडला जात आहे तो
शेतकरी. आडत बाजार बंद झाला, त्याच बरोबर भाजी मार्केट ही बंद झाले. परिणाम
शेतकऱ्यांच्या माळव्याला कोठेच भाव मिळेना. माळव्याच्या तोडणीचा खर्च ही या
माळव्याच्या उत्पन्नातून निघेना. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना गेल्या वर्षी
प्रमाणे या वर्षी लॉकडाउनचा फटका मोठया प्रमाणात बसला आहे.
नळदुर्ग शहर व
परिसरातील मुर्टा, चिकुंद्रा, मानेवाडी, होर्टी आदी भागात शेतकऱ्यांनी माळव्यावर
मोठया प्रमाणात भर दिला आहे, भाजी उत्पादन सुरु केले आहे परंतु या भाजीला
बाजारपेठ मिळत नाही. दररोज थोडा थोडा माल काढून नळदुर्गच्या बाजारात बागावानांनी
मागेल त्या किमतीला देवून जाणे या शिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर उरला नाही.
अशातच मानेवाडी ता. तुळजापूर येथील तानाजी धर्मराव सावंत या शेतकऱ्यांनी गेल्या
दोन महीन्यापूर्वी आपल्या शेतात बोरी धरणाच्या काटावर एक एकर पत्ता कोबी ची लागवड
केली होती. सुमारे १५ हजार रोपे आणून लागवड करण्यात आली होती, दरम्यान पत्ता कोबी
काढणीला येई पर्यंत एका एकरासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च सांवत यांनी आपल्या
पत्ता कोबीवर केला आहे. दरम्यान या पत्ता कोबीला बाजारपेठ मिळेल या अपेक्षेने
उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. कोबीचे
गडडे एक ते दोन किलोच्या पर्यंत गेले त्यामुळे त्यांनी कोबी काढण्यास सुरुवात
केली खरी पणे या कोबीला बाजारात एका नगाला ५ रुपयेला ही कोणी घेण्यास तयार होत
नाही. त्यामुळे सावंत यांनी त्यांनी तोडणी केलेले कोबीचे गडडे फुकटामध्ये आपल्या
नातेवाईकांना देवून टाकले, गल्ली मध्ये ही वाटप केले. दरम्यान कोबीसाठी केलेला
खर्च निघणे लांबच राहीले, पण कोबी तोडणीसाठी आलेला ही खर्च ही यातून निघेना झाला.
या सर्व बाबीचा विचार करुन तानाजी सावंत यांनी आपल्या एक एकरातील कोबीचे पिक
काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि खरीप पेरणीसाठी जमीन तयार करण्यासाठी त्यांनी
कोबीच्या पिकातून च नांगर फिरवून ते कोबीचे गडडे शेतातच मातीत काढून टाकले आहे.
दरम्यान या कोबीच्या पिकाच्या वाढीसाठी संबंधीत शेतकऱ्यांनी तीन वेळा महागडी
फवारणी केली होती. परंतु इतके काबाड कष्ट करुन ही शेतकऱ्याला लागवड आणि वाढीसाठी
केलेला खर्च ही निघाला नाही. त्यामुळे लॉकडाउनचा सर्वसामान्य लहान सहान
शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसला आहे, यातून ही शेतकरी पुन्हा खरीप पिकातून तरी
आपल्या ला उत्पन्न मिळेल या आाशेने पुन्हा शेतकरी मातीतला जूगार खेळण्यास सज्ज
झाला आहे. त्याच बरोबर यातून नैराश्याची भावन झुगारून तो पुन्हा नव्याने जगण्याची
कसोटी खेळत आहे. परंतु शासनाने ही अशा शेतकऱ्यांकडे आता तो जगला पाहीजे म्हणून
त्याला अर्थीक पाठबळ देवून त्याला भक्कम उभे राहण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे.