उस्मानाबाद,दि.२७ :
तेरणा महाविद्यालय, मराठी विभागाच्या वतीने पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष उपक्रमाच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत निमंत्रित कवींचे कविसंमेलन ' ऑनलाईन ' पध्दतीने संपन्न झाले.
यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या कविसंमेलनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .या कविसंमेलनाला डॉ.अशोक घोलकर ( प्राचार्य ,तेरणा महाविद्यालय,उस्मानाबाद) यांनी शुभेच्छा दिल्या.या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सदाशिव सरकटे (गेवराई) हे होते.तर कविसंमेलनाच्याअध्यक्षस्थानी डॉ.मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई) हे होते . त्यांनी कविसंमेलनाच्या सुरुवातीला "घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे,
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे.
फुल उमलायला माळरानी गड्या
अत्तराचे झरे जागले पाहिजे."
जळमटांना जुन्या जाळले पाहिजे.
फुल उमलायला माळरानी गड्या
अत्तराचे झरे जागले पाहिजे."
अशी माणसातील माणुसकी जागृत करणारी कविता सादर करून या कविसंमेलनाची जोरदार सुरुवात केली .मानवतावादाचे मूल्य कवितेतून सकळ मानवी जीवनात रुजवण्याचे काम त्यांची ही कविता करते . तोच भाग इथेही साध्य झाला .
सुप्रसिद्ध कवयित्री सौ.संगीता झिंजुर्के -कदम (पुणे) यांनी-
"कुणाचाही कधी कुठे
वाद नसाया पाहिजे
या हृदयीचा त्या हृदयी
संवाद असाया पाहिजे. "
असा संवादाचा सेतू उभा करणारी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली .सर्वांनी एकोप्याने जीवन जगलं पाहिजे,आखिल मानव जातीतील कलह समूळ नष्ट व्हायला पाहिजे ,ही भूमिका या कवितेतून त्यांनी व्यक्त केली.
मा.अरुण पवार (परळी) यांनी
" काळे होते ते गोरे कसे झाले
सरड्याचे रंग माणसायला आले . "
अशी माणसात शिरलेल्या अपप्रवृत्तीवर भाष्य करणारी कविता सादर करून कविसंमेलनाला एक विशिष्ट उंचीवर पोहोचवले.
डॉ.सदाशिव सरकटे (गेवराई)यांनी
" तू स्वप्नांना बळ दे
मी ठिगळ लावतो . "
अशी 'संसारा ' ला परिपूर्णत्व देणारी कविता सादर केली.
कवी मा.अनंत मुंडे (परळी) यांनी बळीराजाच्या जीवनातील दुःख कवितेच्या माध्यमातून समोर ठेवले.आज या ना त्या कारणाने शेतकरी अडचणीत येतो आहे,त्यामुळे तो हतबल होतो.टोकाचे पाऊल उचलून जीवन संपवण्यासाठी प्रयत्न करतो.त्याला धीर देण्याचं काम कवी अनंत मुंडे आपल्या कवितेतून करतात -
"शेतकरी राजा
घेऊ नको फाशी
राहील जग उपाशी
तुझ्याविना . "
अशी शेतकरी जीवनात आशावाद निर्माण करणारी रचना सादर केली .
मा.शंकर राठोड (नांदेड) यांनी शेतकऱ्यांचं वेदनादायी वास्तवचित्र आपल्या कवितेतून रसिक श्रोत्यांससमोर ठेवताना -
"भाकर मातीची खातो
अन् गाणं भी मातीचं गातो
कुठं ठाव हाय आम्हाला बिसलरी
घाम पाण्यात मिसळून पितो. " कविसंमेलनात विशेष रंगत आणली .
मा.सिद्धेश्वर इंगोले(परळी) यांनी "तऱ्हाट झालं जी "या विडंबनाच्याद्वारे व्यसनाधीनतेवर प्रकाश टाकला .
"खणखण वाजं खिशातं
भलतीच सुटलीया खाजं
अलगद वतली घशातं
पहिल्याच धारंची आज
हो ऽऽआगं झनानलं डोस्क्यामंदी
आन् पायामंदी पाय आलं जी
तऱ्हाट झालं जी
तऱ्हाट झालं जी
तऱ्हाट झालं जी..."
ह्या 'सैराट ' मधील गीताच्या चालीवर केलेल्या विडंबनाने हास्याचे कारंजे उडविले .

सौ. अंजली यादव-चाळक (कळंब) यांनी कवयित्री सौ. अंजली यादव-चाळक (कळंब) या कवितेत म्हणतात ,
"कोण जाणे कुठे जाऊन थांबेल हा श्वास
जगायच राहील काही याचा नसेल ध्यास
आठवणीने मागे दोन डोळे पाणावतील
तेवढं कमवत मात्र प्रवास सारा संपवायचा
चूक भूल सोडून देत पैलतीर गाठायचा" मरण अटळ आहे ,त्यामुळे चांगलं जीवन जगा असं कवयित्री म्हणते.
"कधी येईल मृत्यू हल्ली कळत सुध्दा नाही
तरीही स्वतः पुरतं जगणं संपता संपत नाही
जीव लावून माणसांना आपलं करा कधीतरी
आयुष्याचं सुंदर गाणं गुणगुणा कधीतरी" वर्तमान परिस्थितीवर भाष्य करतात.माणसाचं जगणं क्षणिक झालं आहे,जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालं आहे.हल्ली कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही,यावर कवयित्री भाष्य करते.कवी अरविंद हंगरगेकर यांची तवा हसताना ही कविता डोळ्यात पाणी आणून गेली.
कवींनी सादर केलेल्या रचनांनीही रसिक श्रोत्यांना सामाजिक भान दिले . वैविध्यपूर्ण आशय व दर्जेदार गेय कवितांनी संपन्न झालेला हा कविसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वी अडीच तास चालला . ही एक आमच्यासाठी आनंदाची बाब आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड(परळी) यांनी व
आभारप्रकटन प्रा.डॉ.भारत हंडीबाग यांनी केले .
या कार्यक्रमास महाराष्ट्रातून सुप्रसिद्ध लेखिका तनुजा ढेरे (ठाणे), प्रा.डॉ .हनुमंत माने ,प्रा.डॉ.दादाराव गुंडरे,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी (कळंब)प्रा.डॉ.संजय खाडप,प्रा.मथुरा मेवाड (औरंगाबाद),सौ.जयश्री सोनेकर (सेलू,परभणी)प्रा.डॉ.पुष्पा पाटील (मिरज),प्रा.कन्याकुमारी वाघमारे(परंडा),प्रा.अनुराधा जाधव (लातूर),प्रा.विश्वास साबळे(पुणे),मा.महेश लांडगे प्रा.विश्वास साबळे(पुणे),मा.महेश लांडगे (एपीआय,नांदेड),डॉ.अनंत वडघणे, डॉ. महादेव देशमुख (सोलापूर) मा.मनीषाताई पोतदार , प्रा. डॉ. लक्ष्मण थिटे (नळदुर्ग),डॉ. संतोष पवार(नळदुर्ग), प्रा.डॉ. हरिश्चंद्र गायकवाड ( परंडा ) , प्रा.डॉ. सोनटक्के राजाराम (आष्टी), प्रा.डॉ. शंकर वाघमारे ,कवी अविनाश मुंढे ,कवी प्रतीक कांबळे,(उस्मानाबाद),कविताताई पुदाले(नळदुर्ग),युसूफभाई सय्यद(खेड ),मा.विशाल चिपडे (बार्शी),कवी सागर ( पेन ),शाहीर शीलरत्न नरवाडे,(नंदूरबार),प्रा.विश्वास साबळे( पुणे),डॉ. सुरेश रासकार( पुणे),डॉ. अमोल कवडे (पुणे ),बाल कवयित्री श्रृती चौधरी (उमरगा), रमेश साळुंके ( बारामती) यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात रसिक या कविसंमेलनाचा आस्वाद घेतला.
तर
महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.अरुणा सावरगावकर,डॉ.मंजुषा बाबजे,डॉ.अनघा तोडकरी,प्रा.सुनिल पाटील,प्रा.सुधाकर चव्हाण,प्रा.जयंत कांचनबटवे, प्रा.उत्तरेश्वर तवले,प्रा.प्रतुल चव्हाण,प्रा.रणजित वरपे,मा.बालाजी निचळ,मा.कैलास कापसे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी , विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .