उस्मानाबाद, दि. 26   : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार   दि. 17  मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 306 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 344 जण बरे होवून घरी परतले आहेत. त्यामुळे दिलासादायक ठरत आहे.


जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 53 हजार 490  इतकी झाली आहे. यातील 48  हजार 185 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 201 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 हजार 104 जणांवर उपचार सुरु आहेत.

 
Top