काटी,दि.२६: 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.(26) रोजी सकाळी देशावर, राज्यावर सध्या करोना विषाणूचे भयंकर संकट असून लॉकडाऊनमुळे येथील भिमनगरमधील मोजक्याच गौतम बुद्ध उपासकांनी येथील  बुद्ध विहारात शासकीय नियमांचे पालन करीत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची  जयंती साधेपणाने  साजरी करण्यात आली. 

प्रारंभी ताई सुरते, रंजना शेरखाने, गौतम बनसोडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीचे पुजन  करुन करण्यात आले. त्यानंतर यावेळी गौतम बुद्ध जयंती निमित्त लहान मुलांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.  


 यावेळी गौतम बनसोडे, ताई सुरते, रंजना शेरखाने, शिवपाल घोंगडे, तानाजी सरोदे, सचिन बनसोडे, अर्जुन साबळे आदीजण उपस्थित होते.
 
Top