कळंब,दि.२६:
अजय रमेश घोडके, रा. कळंब यांच्या मामाच्या भ्रमणध्वनीवर दि. 22 मे रोजी 18.48 वा. सु. एका अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांकावरुन संदेश आला की, “तुमचे सिम बंद होणार आहे.” यावर अजय यांच्या मामाने संदेश आलेल्या क्रमांकाशी संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने, “मी अमित मिश्रा बोलत असुन तुच्या सिम सत्यापनासाठी केवायसी अद्ययावत करणे आवश्यक असुन काही रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.
यावर अजय यांच्या मामाने त्यांच्या डेबीड कार्टवरील अंक व आवश्यक माहिती त्या समोरील व्यक्तीस सांगीतली. यावर त्या व्यक्तीने अजय यांच्या मामाच्या भ्रमणध्वनीवर बँकेकडून आलेले 5 ओटीपींचे लघू संदेश विचारुन घेउन अजय यांच्या मामांच्या बँक खात्यातील एकुण 94,950 ₹ रक्कम ऑनलाईन पध्दतीने अन्य खात्यात स्थलांतरीत केली. अशा मजकुराच्या अजय रमेश घोडके यांनी दि. 25 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.