मुंबई, दि. 13 :

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात राज्यातील कडक निर्बंध पुढे वाढवण्यावर एकमत झाले असून त्यानंतर आता ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत होती त्याला आळा घालण्यासाठी ठाकरे सरकारनं सुरुवातीला ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर हे निर्बंध १५ मे पर्यंत वाढवण्यात आले होते. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील वाढ स्थिरावली असली तरी कडक निर्बंध हटवून राज्य सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. 

दूधसंकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यावरील निर्बंध या काळात शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे दूध विकण्यावर अत्यावश्यक सेवेत असल्याने दिलेल्या नियमांनुसार परवानगी देण्यात आली आहे. घरपोच सेवा सुरू राहील.

एअरपोर्ट, मालवाहतूक, औषधांचा पुरवठा आणि कोविड व्यवस्थापनात जे कोणी कर्मचारी असतील त्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्यावर सूट

स्थानिक जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणाने कोणत्याही प्रकारे निर्बंध लादत असताना त्याची माहिती ४८ तासापूर्वी देणं बंधनकारक आहे.





 
Top