काटी,दि.१२:
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रतिष्ठित तथा तुळजापूर कुलस्वामिनी सुतमीलचे माजी संचालक सुर्यभान लक्ष्मण हंगरकर वय 71 यांचे बुधवार दि. 12 रोजी सायंकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते प्रा. अभिमान हंगरकर यांचे जेष्ठ बंधू तर सहशिक्षक अनिल हंगरकर यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,चार विवाहित मुली,भाऊ,तीन बहिणी,मेव्हुणे,जावाई,नातवंडे,
परतुंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 9 वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावातील एक प्रतिष्ठित मनमिळाऊ व्यक्तीमत्व तथा तरुणांचे मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.