तुळजापूर, दि. १२ :
तुळजापुरातील प्रसिद्ध सराफ व्यापारी पंडितराव शिराळकर यांचे वार्धक्याने वय ८५ वर्ष यांचे निधन झाले.
अनेक वर्षापासून ते विश्रांती मध्ये होते. आकस्मित वार्धक्याने त्यांचे १२ मे रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी त्यांना दिवसभर समाज माध्यमावर श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत हिराळकर यांचे ते वडील होत.