![]() |
उस्मानाबाद, दि. 04 : उस्मानाबाद जिल्हयात आज मंगळवार दि. 4 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 786 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 19 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 787 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 41 हजार 101 इतकी झाली आहे. यातील 33 हजार 234 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 974 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 हजार 893 जणांवर उपचार सुरु आहेत.