तुळजापूर, दि. 04 
 चारचाकी वाहनातून गाय, म्हैस व वासरे असे मिळुन ५जनावरांची   निर्दयतेने   महामार्गावरून वाहतूक करित असताना वाहन चालकावर तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


सोमवार रोजी तुळजापूर सोलापूर मार्गावरील सांगवी मार्डी शिवारात ही घटना  दरम्यान उघडकीस आली. 

अरीफ आसीफ सय्यद, रा. नेहरु नगर, उस्मानाबाद हे दि. 3 मे रोजी 1 वाजण्याच्या सुमारास  तुळजापूर- सोलापूर रस्तावरील सांगवी मार्डी शिवारात अशोक लेलँड दोस्त वाहन क्र. एम.एच. 25 पी 5525 मध्ये एक गाय, दोन वासरे व दोन म्हशीची रेडके अशी 5 जनावरे दाटीवाटीने भरुन त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने वाहतुक करत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन तुळजापूर पोलिस.ठाणे पोलीस अंमलदार- जयप्रकाश गलांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सय्यद यांच्याविरुध्द प्राण्यांना क्रुरतेने वागणुकीस प्रतिबंध कायदा कलम- 11 (1) (ए) (डी) (एच) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top