उमरगा, दि. ४
राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदेशीररित्या अशोक लेलँड दोस्त या वाहनातून गांजाची 78.73 किलोग्रॅम वाहतूक करित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडून आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तलमोड ता. उमरगा येथील अंतरराज्य तपासणी नाक्यावर घडली.  


 कोविड- 19 साथीच्या पार्श्वभुमीवर उभारण्यात आलेल्या तलमोड, ता. उमरगा येथील आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर दि. 03.मे  रोजी 23.55 वा. उमरगा पोलीस वाहनांची तपासणी करत होते. 


यावेळी अशोक लेलँड- दोस्त एम.एच. 14 जी 6515 या वाहनाची पोलीसांनी तपासणी केली असता प्रकाश नरेंद्र बेहरा , रा. पुणे हा त्या वाहनातून गांजा या मादक वनस्पतीची  पाने, फुले, फळे असे एकुण 78.73 कि.ग्रॅ. गांजा अवैधरित्या वाहुन नेत असल्याचे आढळले. यावरुन उमरगा पोलिस ठाणे  सपोनि- सिध्देश्वर गोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एन.डी.पी.एस. कायदा कलम- 20 (ब) अंतर्गत गुन्हा आज दि. 04 मे रोजी नोंदवला आहे.
 
Top