उस्मानाबाद, दि. 15 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 15 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 607 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 819 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 48 हजार 464 इतकी झाली आहे. यातील 41 हजार 473 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 105 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5 हजार 886 जणांवर उपचार सुरु आहेत.