नंदगाव, दि. 15
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे 20 बेडचे कोवीड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन शनिवार दि. 15 मे रोजी जि. प. प्राथमिक शाळेत करण्यात आले.
तुळजापूर पं. स. सभापती रेणुका इंगोले, तहसिलदार सौदागर तांदळे , गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत विलगीकरण कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले .
यावेळी प्रमुख उपस्थिती जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सातपुते विस्तार अधिकारी भांगे, पं. स. सदस्य सिध्देश्वर कोरे, सरपंच श्रध्दानंद कलशेट्टी, उपसरंपच दशरत काटे , डॉ. सात्विक शहा , डॉ.आरबळे, ग्रामविकिस अधिकारी , आर पी.दड्डे , तलाठी गजानंद मोरे , भिमराव चिनगुंडे ग्रा.प.सदस्य , मल्लिनाथ गुड्डे, बलभिम चौगुले, संगण्णा कट्टे, युवानेते.वैभव पाटील , आप्पा गबुरे आशा कार्यकर्ती , व ग्रामस्त उपस्थित होते.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून २० बेडचे आयसोलेशन सेंटर उभा करण्यासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या गावातील डॉ. सात्विक शहा, डॉ. आरबळे यांचे सत्कार करण्यात आले.
त्याचबरोबर आशा कार्यकर्ती .ग्रा.प.कर्मचारी यांचेही सत्कार सभापती, गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्याकडुन करण्यात आले.
कोवीड सेंटरला मदत करणारे पंडित गुड्डे, सोमनाथ गुड्डे, शिवपूत्र कलबुर्गी या संर्वाचे सरपंच उपसरपंच ग्रा.प.सदस्य व अष्टविनायक ग्रुप व ग्रामस्त या सर्वानी आभार मानले. या विलगीकरण कक्षासाठी गावातील नागरिकांनी सहकार्या करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थितीतांचे आभार सिद्धेश्वर कोरे यांनी मानले.