उमरगा,दि.१५:
उमरगा तालुक्यातील तुगाव येथील ग्रामस्थांना   युवानेते किरण गायकवाड यांच्यावतीने  मास्क तसेच  सैनीटायझर आणि विटामिन आयरन व रोग प्रतिकारक शक्ती   वाढीच्या औषधांचे किट वाटप करण्यात आले 

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना या आजारापासून दक्षता घेण्याबाबत युवासेनेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर युवासेनेच्यावतीने  गावागावात मास्क,सॅनिटायझर ,औषधी  किट वाटप करण्यात येत आहे.

 तालुक्यातील तुगाव येथे   मास्क ,सैनीटायझर व विटामिन आयरन रोग प्रतिकारक शक्ती वाढीच्या गोळ्यांचे कीट देण्यात आले.


यावेळी पालकमंत्री गडाख यांचे  स्वीय सहायक श्रद्धानंद माने पाटिल, दीपक जोमदे,  मोहन शिंदे , विशाल चव्हाण, आकाश राजे,  विनेष कोराळे , विश्वजीत माने, आण्णा फंड आदींनी पुढाकार घेऊन सदरील साहित्य वाटप केले. तसेच शासकीय नियमांचे पालन करावेत असे आवाहन करण्यात आले
 
Top