तुळजापूर, दि. 15
तुळजापुर घाटात एका अवघड वळणावर ट्रक उलटून झालेल्या भिषण आपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी पाहाटेपुर्वी घडली आहे.
अपघात ग्रस्त ट्रक (के. ए. 22 सी. 3812 ) हा लातूरहुन चित्रदुर्गला तुळजापूर मार्गे जात होता. हा ट्रक तुळजापूर घाट उतरत असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकून उलटल्याचे चालकांनी सांगितले. सुदैवाने जिवीतहाणी झाली नसली तरी ट्रकचे चालक, क्लिनर हे गंभीर जखमी झाले आहेत. क्लिनर यास तुळजापुर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.