काटी,दि.२६: उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे मंगळवार दि. २५मे रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २०० जेष्ठ नागरिकाना लस देण्यात आले. नागरिकातुन लसीकरण मोहिमेस उत्सर्फुत प्रतिसाद मिळला.
सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे, माजी उपसभापती विलास डोलारे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून आरोग्य विभाग व प्रशासनाच्या सहकार्याने गावातील 45 वर्षापुढील दोनशे जेष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्य केंद्रासमोर हिरव्या कपड्याचा मंडप टाकण्यात आला होता. स्वतंत्र नोंदणी कक्ष, शिक्षक आणि आरोग्य सेवक,आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आधार कार्ड तपासून नियोजनबद्ध नोंदणी करुन लसीकरण करून घेतले. प्रथम टोकन देऊन नागरिकांना सावलीला बसण्यास सांगण्यात येत होते.
त्यानंतर क्रमाने लसीकरण करण्यात येत होते. त्यामुळे कुठलाही गोंधळ झाला नाही. शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरणाची माहिती आणि महत्व व कोरोनाविषयी मार्गदर्शक सूचना समजावून सांगत कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात येत होते.
या लसीकरण मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉ.सोमेश माशाळकर, डॉ.कराळे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे,माजी उपसभापती विलास डोलारे, कृषी अधिकारी काळे, विस्तार अधिकारी वैरागे, ग्रामविकास अधिकारी कोठे, आशा कार्यकर्ती श्रीमती महानंदा तोडकरी, निता तानवडे, सहशिक्षक चौरे, मोहन भोसले, सुरवसे, वाघ सर अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी सर्फराज नदाफ,एच.ए.साळवे, चौधरी, एएनएम बदाले,माळी आदींसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतले.