नळदुर्ग,दि.२६ :
अंत:करण , मन शुध्द ठेवा ,वाइट चिंतू नका , प्रेमाने वागा , व्यभिचार करू नका , मद्यपान करू नका , व्यासना पासुन दुर रहा , ज्ञान विज्ञान राहाणीमान प्रशासन बुध्दीमता उंचावण्यासाठी व शैक्षणिक व बौध्दीक परिवर्तनासाठी तथागत बुध्दाच्या धम्माची शिकवणची गरज असल्याचे मत नळदुर्ग ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यानी केले .
बौध्द पोर्णिमे निमीत्त नळदुर्ग येथे पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण बुध्द पुजन करण्यात आले .
प्रथमता तथागत भगवान गौतम बुध्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी बुध्द विहार मंडळाचे सचिव बाबुराव बनसोडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण तर बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे यानी त्रिशरण पंचशिल दिले , बुध्द पोर्णिमा निमीत्त मिष्ठन्नदान करण्यात आले.
यावेळी बाबासाहेब बनसोडे , राजरत्न बनसोडे, फुलचंद सुरवसे , नेताजी बनसोडे ॲड. अभिजीत बनसोडे , किशोर नळदुर्गकर, सिध्दांत बनसोडे , योगेश सुरवसे, प्रशिक बनसोडे , प्रणाल गवळी , सोहन कांबळे , हमराज कांबळे , सचिन कांबळे ,फौजी शिलरत्न कांबळे , अमर बनसोडे , यश बनसोडे ,कुलदिप बनसोडे आदिजन कोविड नियमाचे पालन करुन उपस्थित होते .