तुळजापूर, दि. २६ : डॉ. सतिश महामुनी
रिपाई तुळजापूर शहरच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची २ हजार ५६५ वी जयंती बुधवार दि. २६ मे रोजी  शहरामध्ये साजरी करण्यात आली. 


तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन रिपाईचे  जिल्‍हा सरचिटणीस  तानाजी कदम व शहराध्यक्ष अरुण कदम यांच्या हस्ते करण्यात आले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या.  पुतळ्याला हार घालून पूजन प्रदेश सरचिटणीस बहुजन रयत परिषदेचे ईश्वर क्षीरसागर, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आली. 

यावेळी आरपीआय  युवक शहराध्यक्ष अमोल कदम,  रावण सोनवणे. बंटी कदम ,तानाजी धावारे,  हनुमंत सोनवणे,  नागेश कदम, संजय गायकवाड,  तानाजी हावडे, मुकेश चौधरी व आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित  होते. 

 यावेळी आरपीआय जिल्हा सरचिटणीस  तानाजी कदम यांनी आपल्या भाषणात अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे दया शांतीची  शिकवण देणारे विश्ववंदनीय गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आपले विचार मांडले.  

शेवटी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सदरील कार्यक्रम हा सर्व नियमाचे पालन करुन करण्यात  आले.
 
Top