तुळजापूर, दि.२५
तुळजापूर शहरामध्ये कोरोना रुगणाच्या नातेवाईकाकडून पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडाची वसुली करू नये त्यांचा सहानुभूतीने विचार करावा रुग्णाच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर प्रमुख प्रमोद कदम परमेश्वर यांनी केली आहे.



तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण आणले जातात. सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी लागणारे साहित्य देण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक तुळजापूर येथे दुचाकीवरून ये जा करतात, अशा वेळेस तुळजापूर येथील पोलीस कर्मचाऱ्याकडून ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिसी खाक्या दाखवून उद्धटपणे दंडाची वसुली करण्यासाठी दडपशाही केली जात आहे.
 अशा प्रकारची घटना शहरप्रमुख प्रमोद कदम यांनी पोलिसांना निदर्शनास आणून दिली. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी न ऐकता त्यांनी थेट पोलीस स्टेशन मध्ये दाद मागितली .त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास न देता दंड वसुली थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दंड वसुली करीत असताना कारणाची चौकशी करून दंड वसुली केली पाहिजे, दुचाकी आणि चारचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांना सरसकट मशीन द्वारे दंड वसूल करणे कितपत योग्य आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. 


यासंदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणारा असून आगामी काळात पोलिस कर्मचाऱ्यांनी जनतेबरोबर सहानुभूतीने वर्तन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
Top